पुणे : पुणे महापालिकेची डेक्कन वरील सह्याद्री हॉस्पिटल ची १ रु भाड्याची २१००० चौरस फूट जागा मनिपाल समूहाकडे जाणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. पुणे महापालिकेने डेक्कन येथील स. न. ३० क एरंडवणा २१२६७ चौरस फूट ९९ वर्षाचे दुदतीने १ रु नाममात्र दराने कोकण मित्र मंडळास दिलेली आहे. परंतु सध्या माध्यमांमध्ये सदर जागा सहा हजार कोटी रुपयांना मणिपाल समूहाला दिली असल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
कोकण मित्र मंडळाला ही जागा देताना करारात फक्त वर्षांत १ बेड वरील १ पेशंटला फक्त ५० दिवस मोफत उपचार करायची संशयास्पद अट ठेवून मनपाने ही जागा ठेवून उर्वरित चढ्या दराने रुग्णाना बिले आकारले जात आहेत.मूळ टिपणीत ५० कॉटस वर्षभर मोफत उपचारासाठी देण्याची चर्चा आहे प्रत्यक्ष करारात १ बेड ५० दिवस झाले आहे.
सदरचे हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल प्रा. कि. ही संस्था चालवित होती. सह्याद्री हॉस्पिटल च्या संचालकांनी डेक्कन सह्याद्री महाराष्ट्रा बाहेरील कंपनीला यापूर्वी सुपूर्त केले. त्यासाठी मूळ कोकण मित्र मंडळाचे ट्रस्टी यांनी राजीनामे देऊन ज्या कंपनीला सह्याद्री हॉस्पिटल दिले त्यांचे संबंधित लोक कोकण मित्र मंडळाचे ट्रस्टी झाले.
आता सह्याद्री हॉस्पिटल सर्व चैन मनिपाल उद्योग समूहाने ६,००० कोटी घेतले. अशी बातमी माध्यमांनी दिली आहे.
सबब पुणे मनपाची जागा मनिपाल समूहाकडे जाऊन पालिकेचा गरीब रुग्णांचा उद्देश असफल होणार आहे. त्यामुळे धर्मादाय उद्दिष्ठासाठी शासनाकडून १ रु नाममात्र भाड्याने जमीन घेतलेल्या रुग्णालयांचे कंपनीकरण होत आहे. हे करताना पालिकेची कोट्यावधी रुपयांची जागा फक्त १ रु. वापरली जात आहे.
पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक यांसी विनंती, महापालिका आयुक्तांनी पालिकेची जागा वाचवली पाहिजे अशी मागणी राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे.