बाणेर : म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव काही समाज कंटकांनी गुगल मॅपवर “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॅाम्प्लेक्स” असे बदलल्याचे निदर्शनास आले. तसेच याबाबतच्या अनेक तक्रारी शिवप्रेमी, खेळाडु, ग्रामस्थ व नागरीकांनी अमोल बालवडकर यांच्याकडे केल्या होत्या. याबाबत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर पोलिस स्टेशन येथे वरीष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना भेटुन याबाबतची लेखी तक्रार पत्राद्वारे दिली.
अशा प्रकारे गुगल मॅप लोकेशन एडीटचा वापर करुन, तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन काही समाज कंटकांकडुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे तरी अशा विकृतींना (दोषींना) तातडीने शोधुन त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पोलिसांना निवेदनाद्वारे केली.