बाणेर : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाच्या शहर उपाध्यक्ष पदी राहुल बालवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार निलेश लंके, सुनील चांदेरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाणेर बालेवाडी परिसरात विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमात घेऊन ते कार्य करीत आहेत. शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती बद्दल त्यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.