पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना रेशनिंग कार्ड इथलं नाही म्हणून पालिकेची आरोग्य सुविधा मिळत नाही अशा नागरिकांना मतदार यादीत नाव असेल तर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल यासाठी आयुक्तांशी बोलणे करून शहरी गरीब आरोग्य योजनेचा लाभ मराठवाड्यातील जनतेला मिळवून देऊ अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बालेवाडी येथे केली.
माजी नगरसेवक अमोल बालवडकर व अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित मराठवाड्यातील नागरिकांसाठी सरंजाम वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, रतन बालवडकर, माजी नगरसेवक किरण दगडे, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, स्वप्नाली सायकर, लहू बालवडकर, अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, सुभाष भोळ, अनिकेत चांदेरे, सुहास भोते, अनिल ससार, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर, मोरेश्वर बालवडकर, आशिष ताम्हाणे, सागर बालवडकर,रोनक गोटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अमोल बालवडकर यांनी रेशनिंग कार्ड इथलं नाही म्हणून मराठवाड्यातील व विदर्भातील अनेक नागरिकांना शहरी गरीब आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नाही ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच मराठवाड्यातील नागरिकांसाठी मराठवाडा सेवा मंडळ स्थापन करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठवाड्यातील जनतेला आरोग्य योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्तांशी बोलून मतदार यादी मध्ये नाव असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शहरी गरीब योजनेचे फायदे देण्यात यावेत यासाठी प्रयत्न करून हे फायदे मिळवून देऊ अशी घोषणा यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यक्रम दरम्यान केली. तसेच मराठवाड्यातील सर्व महाविद्यालय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली मदत देण्याचे आश्वासनही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.