माले येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन पालक व विद्यार्थ्यांचा सहभाग

मुळशी : माले, तालुका मुळशी, जिल्हा परिषद शाळेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन करण्यात आले यावेळी पालक व बालक यांना मुलांनी रंगवलेल्या पणत्या व भेटकार्ड तसेच दिवाळी फराळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी संतोष फापाळे (केंद्र प्रमूख माले केंद्र), प्रियतमा दसगुडे (मुख्याध्यापक शाळा माले), विकास दातीर (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), दीक्षा ठकोरे, अश्विनी दातिर, अनिता दातीर, नलिनी दातीर, संचीता शेलार, अल्लका मुल्ला, रेणुका आक्के आदी उपस्थित होते.

दिवाळीनिमित्त शाळेमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच आकाश कंदील, पणत्या फुलबाजा तसेच दिवाळी फराळाची मेजवानी करण्यात आली. जिल्हा परिषद शाळांमधील दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच अन्य उपक्रमांची माहिती यावेळी पालकांना देण्यात आली.

See also  भारतीय बाजारात सोन्याला झळाळी. प्रति १० ग्राम ६० हजाराच्या पार.