आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती कोथरूडमध्ये उत्साहात साजरी

कोथरूड : अखिल कोथरूड मातंग समाज पुणे शहर यांच्या वतीने कोथरूड मधील अण्णाभाऊ साठे चौक येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.

यावेळेस समाजातील विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना विनम्र अभिवादन केले. समाजातील जातिभेदांच्या भिंती पाडण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी क्रांतीगुरूंचे विचार समजून घेत ते सर्वसामान्य जनमानसात रुजवणे खूप गरजेचे असल्याचे मत अखिल कोथरूड मातंग समाज पुणे शहर चे अध्यक्ष किरण आडागळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी किरण अडागळे, सुरज कदम, सुनील रिठे, महादेव शाहीर, मयूर सकट, विजय डाकले, गणेश वरपे, ॲड. अमोल काळे, जितेंद्र कोंढरे, अंकुश लोंढे, बाळासाहेब खकाळ, राज जाधव, नामदेव ओव्हाळ, किशोर मारणे, प्रशांत कांबळे, प्रदीप उदागे, अमोल मोरे आणि ऋषिकेश मारणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  औंध रोड येथील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा : सुनील माने यांची महापालिका आयुक्तांची भेट