आळंदीतील कोकरे महाराज यांचे उपोषण बाराव्या दिवशी मागे

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील विविध समस्येसह समान नागरी कायदा, सर्वाना मोफत शिक्षण, गोशाळेस जागा, अनुदान, आदी मागण्यांसाठी १ नोव्हेंबर पासून इंद्रायणी नदी घाटावर राष्ट्रकल्याण सामुदायिक जनआंदोलनचे माध्यमातून कर्मवीर भगवान महाराज कोकरे यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. येत्या दहा दिवसांत विविध मागण्याचे विषयावर चर्चेसाठी मंत्रालयात बैठकीची ग्वाही माजी आमदार व राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी ग्वाही देत कोकरे महाराज यांनी उपोषणाचे बाराव्या दिवशी ( दि. १२ ) उपोषण मागे घेतले. यावेळी उपस्थित महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, आमदार रवींद्र धंगेकर यांचेसह अनेकांनी कोकरे महाराज यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार कोकरे महाराज यांनी आपले उपोषण अखेर सर्वांचे विनंतीस मान देऊन मागे घेतले.


यावेळी माजी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी कोकरे महाराजां समवेत संवाद साधला. व्यासपीठावर उपोषण मागे घेण्यास आवाहन करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून येत्या १० दिवसांत बैठक लावण्याची ग्वाही भेगडे यांनी दिली. तसेच वारकरी संप्रदायातील उपस्थित महाराज मंडळी, पंढरपूर, देहू देवस्थानचे विश्वस्त, आमदार रवींद्र धंगेकर आदींनी रास्ता मागण्या असल्याने यासाठी पाठपुरावा करून मागण्या मान्य होई पर्यंत पाठपुरावा केला जाईल असे सांगत उपोषण मागे घेण्याची केलेली विनंती यास प्रतिसाद देत कोकरे महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचे हस्ते जलपेय घेत उपोषण मागे घेतले. यावेळी हरिनाम गजर आणि पसायदानाने उपोषणाची सांगता झाली.


येथील इंद्रायणी नदी घाटा शेजारील विश्वरूपदर्शन शेजारी भगवान महाराज कोकरे यांचे उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी भेटी दिल्या. यात श्रीराम मंदिर न्यास अयोध्याचे खजिनदार आचार्य गोविंदेवगिरीजी महाराज, अक्षय महाराज भोसले, पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर, संजय महाराज बालवडकर, प्रकाश महाराज बालवडकर, मोहन महाराज शिंदे, आळंदी शहर शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण ( शिंदे गट ) आदींचा समावेश होता.
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मिलिंद एकबोटे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ, गोभक्त हिंदुभूषण मिलिंदजी एकबोटे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, राम गावडे, राजाभाऊ चोपदार, नरहरी महाराज चौधरी, श्याम महाराज राठोड, पांडुरंग महाराज शितोळे, अजित वडगावकर, किरण येळवंडे, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, महंत मौनी महाराज, सचिन गिलबिले, पांडुरंग वहीले, संकेत वाघमारे तसेच पिंपरी चिंचवड पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
समान नागरी कायदा, आर्थिक निकषावर आरक्षण, इंद्रायणी नदी प्रदूषण, सिद्धबेट विकास, शेत मालाला हमी भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी इंद्रायणी नदी घाटावर भगवान महाराज कोकरे यांनी बारा दिवस उपोषण करीत लक्षवेधी मागण्यांसाठी आंदोलन ऊभे केले यास मोठा प्रतिसाद मिळाला. उपोषण सोडल्या नंतर श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थचे वतीने उपाध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांचे तर्फे वारकरी संप्रदायास महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, प्रकाश महाराज बालवडकर, संजय महाराज बालवडकर, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिन महाराज शिंदे आदी उपस्थित होते.

See also  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्कारचे वितरण