वारकऱ्यांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे सहकार्याने लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज,माय माऊली केअर सेंटर पुणे समता फाउंडेशन मुंबई व ससून नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत, मोतीबिंदू तपासणी व मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप असे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कोतवाल चावडी दगडूशेठ हलवाई चौक काका हलवाई समोर बुधवार पेठ पुणे येथे वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 9781 वारकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी बऱ्याच वारकऱ्यांची नोंद झाली. त्या सर्व वारकऱ्यांना सांगितले आहे आपण संपर्क करा पूर्णतः मोफत ऑपरेशन केले जाईल असे सांगण्यात आलेले आहे अनेक वारकऱ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आज पुणे मुक्कामी पालख्या असल्यामुळे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासण्या मोफत औषधे वाटप ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले त्या सर्व तपासण्यांचा वारकऱ्यांनी लाभ घेतला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मा.श्री.प्रवीणकुमार पाटील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष माय माऊली केअर सेंटर पुणे लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज व झोन चेअर पर्सन ला. विठ्ठलराव वरुडे पाटील ला.हेमलता जैन आणि मंडळाचे कार्यकर्ते व मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

See also  पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे