बाणेर येथे मुरकुटे गार्डन परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रविंद्र धंगेकर यांच्यासाठी प्रचार

बाणेर : बाणेर येथील मुरकुटे गार्डन परिसरात मतदार राजाशी संवाद साधून महाविकास आघाडीचे इंडिया फ्रंट चे लोकप्रिय उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.


यावेळी इंडिया फ्रंटचे महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे मा. जीवन चाकणकर (कॅाग्रेस), नाना वाळके (शिवसेना UBT), अशोक दळवी (शिवसेना UBT), दत्ता जाधव (कॉँग्रेस), अमर लोंढे (कॅाग्रेस), मंगेश निम्हण (कॉँग्रेस), अमोल लोंढे (कॉँग्रेस), सचिन नखाते (शिवसेना UBT), रणजीत शिंदे (शिवसेना UBT), प्रशांत ठोसर (शिवसेना UBT), निरज वाल्मिकी (शिवसेना UBT), अमर लोंढे (कॉँग्रेस), रुपेश बालवडकर (सामाज सेवक), विक्रम गायकवाड (आम आदमी पार्टी), रितेश निकाळजे (आम आदमी पार्टी), ज्ञानेश्वर गायकवाड (आम आदमी पार्टी) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मुरकुटे गार्डन मध्ये फिरायला येणारे नागरीक, जेष्ठ नागरीक, भाजी विक्रेते व श्रमिक कामगार वर्गाशी सवांद साधून प्रचार करण्यात आला. महागाई, भ्रष्टाचारांना सोबत घेऊन स्थापन करण्यात आलेली सत्ता, आरोग्य व शिक्षण सुविधा आधी प्रश्नांसंदर्भात नागरिकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

See also  राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल