गुलटेकडी एकता प्रतिष्ठाण च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

गुलटेकडी : गुलटेकडी एकता प्रतिष्ठाण च्या वतीने सालाबादप्रमाणे गुलटेकडी चौक (गिरीधर भवन) येथील उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभवर भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण
सामाजिक कार्यकर्ते पुणे लोकसभेचे प्रभारी श्रीनाथ भिमाले ,
यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आयोजक मा गणेश शेरला ,डाॅ प्रसाद खंडागळे, राहुल लोंढे,सोमनाथ शिंदे उपस्थितीत होते.
बालगोपाळांना खाऊ वाटून प्रजासत्ताक दिनाच्या च्या शुभेच्छा देण्यात आले. स्वतंत्र साठी आपल्या देशाचे असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या सर्वांचे शतशः ऋणी राहुयात असे गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने मनोगत गणेश शेरला यांनी व्यक्त केले. व सर्व प्रमुख मान्यवरांनी नागरिकांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिष्ठाणच्या वतीने मा नगरसेवक प्रवीण चोरबोले शारदा पंलगे,नसीम शेख,प्रतिक भिमाले,गणेश शिवशरण, रमेश बिबवे , सचिन खंडागळे ,मारुती कांबळे ,नझीर शेख, संजय साठे, महेश साळुंखे, अजय शिंदे,रुपेश राजभर, पवन शेंडगे ,सागर नराल यांच्या परिश्रमातून ध्वजा रोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

See also  बाणेर येथे रूफ टॉप हॉटेल व अनाधिकृत बांधकामावर कारवाई