सोशल मीडियावर पत्र लिहिणे ही देवेंद्र फडणवीस यांची केवील वाणी नौटंकी – आम आदमी पार्टी

पुणे : नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकावर बसत अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दाखवला त्यानंतर भाजपा सह महायुती सरकारवर सर्व शहरातून टीका होऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर सोशल मीडियावर पत्र लिहिणे ही देवेंद्र फडणवीस यांची केविलवाणी नौटंकी असल्याची टीका आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.

आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, एकदा भ्रष्टाचाऱ्यांना तपासयंत्रणा च्या मदतीने पक्षात ओढण्याचे वॉशिंग मशीन घेऊन सत्तेच्या बाजारात उतरल्यावर नबाब मालिक आणि अजित दादा पवार, भुजबळ, नारायण राणे काय किंवा इतर कोणीही भाजपला चालणारच हे उघड आहे. परंतु जनतेपुढे भाजप चे पितळ उघडे पडत असल्याने आणि पार्टी विथ डिफरन्स चा शिक्का टिकावा यासाठीची सोशल मीडियावर पत्र लिहिणे ही देवेंद्र फडणवीस यांची केविलवाणी नौटंकी आहे.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने ‘सारथी’च्या मुख्य इमारतीचे उद्घाटन