उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

पुणे दि.२५ : इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, इंदापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

नविन बांधकाम ७ हजार ३९२ चौ. फुट जागेत करण्यात येणार आहे. बांधकामाला एकुण अंदाजे खर्च १ कोटी ८३ लाख ४६ हजार ९२६ रूपये येणार आहे.

See also  अमोल बालवडकर फाउंडेशन च्या वतीने कोथरूड येथील जीत मैदान येथे महिला मेळावा संपन्न; हजारो महिलांची उपस्थिती