लवासा गडले येथे बिबट्याचा जिवघेणा हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू .

पुणे :- लवासा येथील गडले – दुधवान (ता. मुळशी) येथे बिबट्याचा जिवघेणा हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला असून डोंगर दर्या असलेल्या परिसरात शेतकरी भयभीत झाले आहे. मोसे खोर्यातील सह्याद्रीच्या परिसरात वाघाचा वावर होत असल्याचा शेतकर्यांचे म्हणणे आहे.

याबाबत शेतकरी आणि मृत्यु पावलेल्या जनावरांचे मालक विठ्ठल मरगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार विषयावर जिवघेणा हल्ला करणारा प्राणी हा वाघ होता. वाघाच्या हल्ल्यात एक वासरू ठार झाले असून त्याचा कोथळा बाहेर काढून वाघाने फडशा पाडला आहे. तर दुसरे वासरू वाघ घेऊन गेला आहे.‌ त्याचा शोध घेण्यासाठी स्वतः शेतकरी मरगळे सांगितले आहे. मरगळे यांनी काल शुक्रवार दि. ८ रोजी सकाळी गाई म्हशींसह सर्व जनावरे गुरे रानात चरायला सोडली होती. त्याच दिवशी दुपारी ११:०० वाजण्याच्या सुमारास वासरू हंबर्डे फोडत असल्याचा आवाज गडले गावातील काही महिलांनी ऐकला होता. त्याच संध्याकाळी वासरे घरी परत आले नाही म्हणून मरगळे रानात वासराला शोधण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वाघाच्या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी झालेल्या अवस्थेत पाहायला मिळाले.
त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे पशुधनाची होणारी नुकसानी बाबत वनविभागाने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी व वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक होत आहे.
याबाबत वनविभागाच्या अधिकारी कल्याणी रो माचा यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, शेतकरी विठ्ठल मरगळे यांच्याकडून खात्रीशीर माहिती घेऊन पंचनामे करू असे सांगितले

“मोसे खोर्यात वाघांचे दर्शन”….
मोसे खोर्यातील गडले दुधवान परिसरातील जंगलात एक दिवस अगोदर येथील स्थानिक लोकांना दोन वाघांचे दर्शन झाले होते. त्यामुळे गावातील आजूबाजूच्या परिसरात वाघांच्या झालेल्या दर्शना मुळे व पशुधनावरील हल्ल्या मुळे गावात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“”मोसे खोर्यात वाघ नाहीच.. तो बिबट्या असल्याची शक्यता…..” वन अधिकारी.
सह्याद्री डोंगर रांगाच्या मोसे मुळशी खोर्यातील परिसरात कोणत्याही प्रकारचे वाघ नाहीत. तर या परिसरात सर्रासपणे बिबट्यांचा वावर असतो. बहुदा शेतकरी त्या प्राण्याला बिबट्या ऐवजी वाघ समजत आहेत. अशी माहिती वन अधिकारी कल्याणी रो माचा यांनी दिली.

See also  भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणे शाहित अडकलेला पक्ष आहे. जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते : आप राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया