महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील 149 कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता

पुणे : महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला महायुती सरकारची मान्यता देण्यात आली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पाठपुरावा केला होता.

पुणे महानगरपालिका एकवट मानधनावरील सेवकांना पुणे मनपामध्ये कायमस्वरूपी रुजू होण्यासाठीचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. ज्याचा आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्रस्तावाला महायुती सरकारने मंजुरी दिली आहे.

मंजुरी मिळाल्यानंतर सर्व कर्मचारी अतिशय आनंद व्यक्त केला. पुणे मनपामध्ये कायम सेवेत रुजू होण्याकरिताचे आज्ञापत्र देखील महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने पारीत करण्यात आले असून आता सर्व १४९ सेवक पुणे मनपामध्ये रुजू झालेले आहेत.

यावेळी कर्मचाऱ्यांनी दीपक मानकर यांची भेट घेत आभार व्यक्त केले. यावेळी सागर उत्तम काशिद, सुभाष मालसिंग नागवडे, विजया गायकवाड, सुनिता मोरे, सुमित जगताप यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

See also  औंधमध्ये सामुहीक तुलसी विवाह सोहळा