काँग्रेसच्या वतीने कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : पर्वती ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या वतीने पर्वती दर्शन, लक्ष्मी नगर, पर्वती गाव या भागातील सार्वजनिक शौचालयाची दैयनीय अवस्था तुटलेले दरवाजे, ड्रेनेजची निखळलेली झाकणे,रस्त्यावर पडलेले खड्डे अशा अनेक नागरी असुविधा विरोधात कसबा विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालय येथे शौचालयसाठी वापरल्या जाणाऱ्या बादल्या घेवुन आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी प्रवेशद्वाराला बादल्याचे तोरण बांधण्याचा प्रयत्नही पर्वती ब्लाँक अध्यक्ष संतोष पाटोळे यांनी केला, यावेळी द‌.स. पोळेकर,सतिष पवार,नेहरु स्टेडियम ब्लाँक अध्यक्ष हेमंत राजभोज, वडगाव शेरी अध्यक्ष राजु ठोंबरे ,हरिश यादव ,क्रीडा शहर अध्यक्ष आशुतोष शिंदे ,सद्दाम शेख,मामा परदेशी, शबीर शेख,शाम काळे , राजेंद्र पेशने ,केतन जाधव अक्षय सागर विराज,सोंडकर,राजु गाढे ,नागेश रायकर,ऒम भवर, कुदळे समर्थ अडागळे,साई पाटोळे,अँड ,गवारे ताई,कसबे ,तावरेताई ,किर्वे ताई, मनिषा गायकवाड़ आदि उपस्थित होते.

See also  शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा - स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे