सुस मधील पेरिविंकल मध्ये भरली चिमुकल्यांची भाजी मंडई

सुस : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस ब्रांच मधील प्री – प्रायमरी सेकशन च्या चिमुकल्यांनी शालेय परिसरात सब्जी मंडीचा अनुभव घेतला म्हणजेच भाजी मंडई शाळेतच थाटून सर्व भाज्यांची स्वतः पालकांना माहिती देऊन वजन कसे करायचे याचा अनुभव घेतला.


फास्ट फूड च्या जमान्यात विद्यार्थ्यांना फळभाज्या, फुलभाज्या, पालेभाज्या यांची ओळख करून त्यातून मिळणाऱ्या जीवनसत्वाची ओळख त्यांची असणारी आवश्यकता व त्याचे फायदे कळावे हे या भाजी मंडई भरवण्यामागील प्रमुख उद्दिष्ट होते. या मंडई मध्ये भेंडी, कोबी, गाजर, मटार, वांगी मुळा, पालक मेथी अशा सर्व भाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. सर्व विद्यार्थी भाज्याची माहिती देत होते.
याबरोबरच वजन कसे करावे, चलनी नोटा व नाणी यांची ओळख करून त्याचा वापर व देवाणघेवाण कळावी म्हणजेच विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान काळावे यासाठी आजच्या या भाजी मंडई चे आयोजन करण्यात आले होते.


सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भाजी विक्रेते किंवा शेतकऱ्याचा पोशाख परिधान करून भाजी विकण्याचा मनमुराद आनंद लुटला. आपल्या या पेरिविंकल शाळेतील चिमुकल्यांकडून भाजी विकत घेण्यासाठी पालकांचा देखील उस्फुर्त व भरगोस प्रतिसाद मिळाला. केवळ पालकच नव्हे तर इतर ग्रामस्थ्यांनी देखील यात सहभाग घेतला.
अशा प्रकारे पेरिविंकल मधील प्री -प्रायमरी विभागाने एक आगळी वेगळी मंडई भरवून आपल्या जीवनात भाज्यांचे महत्व व शेतकऱ्यांचे महत्व पटवून देण्यासाठी अत्यंत आगळा असा उपक्रम राबवला. या सब्जी मंडई ला शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
पर्यवेक्षिका सौ शुभा कुलकर्णी , सन्मती चौगुले, सचिन खोडके यांच्या सहकार्याने व सर्व विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने आजची भाजी मंडई एक आगळी वेगळी ओळख देऊन गेली.

See also  शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे करणार मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश