स्विगी डिलिव्हरी बॉयच्या टोळक्याकडून सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण.

बालेवाडी : बालेवाडी येथे स्विगी डिलिव्हरी बॉयच्या टोळक्याकडून सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.बालेवाडी येथील पार्कलॅंड सोसायटीत हा प्रकार नुकताच घडला.

रात्री स्विगी पार्सल घेऊन एक डिलिव्हरी बॉय आला.गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले की मोटरसायकल येथे पार्क कर आणि एंट्री करून आत जा. याचा त्या मुलाला राग आला. त्याने धमकी दिली की आम्ही गाववाले आहोत आम्हाला कुणी अडवु शकत नाही. हा डिलिव्हरी बॉय तेथून निघाला आणि थोड्याच वेळात चार पाच डिलिव्हरी बॉयचे टोळके घेऊन आला. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते . त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यांच्या हातात कडे किंवा साखळी असावी त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्याच्या डोक्याला जबर जखम झाली. बालेवाडीत डिलिव्हरी बॉईज यांची दादागिरी वाढत चालली आहे. सोसायटींनी पार्किंग व एंट्री संबधी काही नियम बनविलेले असतात. याचे पालन करायला डिलिव्हरी बॉईज नकार देतात व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हटकल्यास शिवीगाळ, धमक्या व मारहाण करतात. यापूर्वी काही सोसायटीत हा प्रकार घडला आहे. याशिवाय लिफ्ट आठवून ठेवणे, घुटका खाऊन सोसायटी आवारात व लिफ्टमध्ये थुंकणे, बेशिस्तपण गाड्या पार्क करणे व रहिवाशांनी अटकाव केल्यास त्यांना उद्धट भाषेत उत्तर देणे असे अनेक सोसायट्यांनी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनला कळविले आहे.या प्रकाराला कंटाळून आणि सुरक्षेच्या कारणास्तव काही सोसायट्यांनी डिलिव्हरी बॉईज यांना प्रवेश बंदी केली असून गेटवरच डिलिव्हरी देण्याचे नियम केले आहेत. यामुळे रहिवाशांचे मात्र हाल होत आहेत.

पार्कलॅंड सोसायटीतील मारहाण प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे की स्विगी च्या आय डी कार्डवर दुसऱ्या व्यक्तीने स्वतःचा फोटो लाऊन प्रवेश मिळविला. जो मुलगा डिलिव्हरी घेऊन आला त्याचे नाव संतोष दळवी आहे परंतु स्विगी कडे विचारणा केली असता त्यांच्याकडे वेगळं नाव व फोटो आहे. काही रहिवाशांनी सांगितले की बदली डिलिव्हरी बॉईज येतात व त्यांची नोंद कंपन्यांकडे नसते.हे प्रकरण म्हणून गंभीर बनले आहे.याची तक्रार बालेवाडी पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

See also  अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथ प्रदर्शनास अभुतपूर्व प्रतिसाद