“AI Studio – Metal X” चे लोकार्पण: डिजिटल नवकल्पनांचे नवे केंद्र

पुणे : राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त iTechSeed India Growth Ventures Pvt. Ltd. आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) यांच्या भागीदारीत “AI Studio – Metal X” चे उद्घाटन करण्यात आले. हा अत्याधुनिक स्टुडिओ नवकल्पना, डिजिटल प्रगती, आणि सहकार्याला चालना देणारे केंद्र आहे. स्टुडिओमध्ये NIVIDIA GPU इन्फ्रास्ट्रक्चर, AR-VR आणि 3D प्रिंटिंग लॅब्स यांसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा आहेत.

उद्योग-शिक्षण सहकार्य मजबूत करण्यावर भर देणाऱ्या या सोहळ्यात उमेश राठोड, संदीप भगवत, आशिष गार्डे आणि मंजीत लाड यांच्या उपस्थितीत “डिजिटल परिवर्तन आणि भारताचा आर्थिक विकास” या विषयावर पॅनल चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात उद्योग-शिक्षण क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

iTechSeed India च्या संचालिका अश्विनी वाघ, सीईओ चेतन वाघ आणि सीबीओ प्रीतम ऑन्स्कर यांनी “AI Studio – Metal X” च्या माध्यमातून नव्या पिढीला AI-तयार करण्याच्या उद्दिष्टावर भर दिला.
कार्यक्रमास PICT चे संचालक डॉ. पी. टी. कुळकर्णी, प्राचार्य डॉ. संजय गंधे, संगणक विभाग प्रमुख डॉ. गीतांजली काळे आणि प्रा. प्रवीण पाटील उपस्थित होते. या केंद्रामुळे डिजिटल भारताच्या स्वप्नपूर्तीत महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

See also  जोरदार पावसामुळे सुस महादेव नगर रस्त्यावर पाहत असलेल्या पाण्यामध्ये परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला