“शांतता, पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमास बाबुरावजी घोलप महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगवी : बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शासनाच्या या अभिनव उपक्रमामध्ये वाचन संस्कृती वृद्धिगत होण्यासाठी तसेच उत्तम आणि जागृत नागरिक बनण्यासाठी मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,असंख्य महापुरुषांच्या आत्मचरित्राचे तसेच युवकांना उद्योग जगतातील नाविन्यपूर्ण क्षेत्रांमध्ये असलेल्या संधी या संदर्भात नव वाचनाचे व्यासपीठ या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमात प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता. त्यांनी आपल्या आवडीचे पुस्तके ग्रंथालयातून घेऊन वाचन केले. ग्रंथालयातील कर्मचारी वर्गाने त्यांच्या आवडीचे पुस्तके पुरविली व वाचन करण्यास प्रोत्साहित केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी विद्यार्थी व प्राध्यापक वर्गास मार्गदर्शन करताना वाचन संस्कृती जपणे किती महत्त्वाचे आहे ? तसेच या थोर महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वातून विद्यार्थी अवस्थेत आपल्याला योग्य मार्ग मिळण्यास मदत होते. त्यातून आपले उर्वरित आयुष्य जडणघडणीमध्ये मदत होते. यासंदर्भात मार्गदर्शन करून स्वतः वाचनात सहभागी झाले. लेफ्टनंट तथा ग्रंथपाल डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांनी आपली वाचनाची आवड जोपासण्यासाठी स्वतः सहभागी व्हावे असे प्रेरित विद्यार्थ्यांना केले. सदर उपक्रमाचे प्रस्ताविक प्रा. संतोष सास्तुरकर यांनी केले व आभार प्रा. भास्कर घोडके यांनी मानले. या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, आयक्युएस्सी समन्वयक डॉ. संगीता जगताप, डॉ. विठ्ठल नाईकवाडी, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रा. भास्कर घोडके, श्री सुनील भोसले श्री .प्रणित पावले, श्रीमती मनीषा कुंभार, श्री किरण कळमकर, श्री योगेश मदने, श्री बाबाजी गायकवाड उपस्थित होते. या अभिनव उपक्रमाला युवा वाचक विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद होता

See also  अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश