‘बार्टी’चा निधी जेवणासाठी नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खर्च करावा – आम आदमी पार्टी

पुणे : बार्टी संस्थेच्या बाहेर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी आंदोलन करत असताना पार्टीच्या वतीने लाखो रुपये निधी सांस्कृतिक व जेवणाच्या कार्यक्रमांवर खर्च केला जात असून हा निधी मुलांच्या शिक्षणासाठी देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.


भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ आहे. त्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ३१ डिसेंबर व १ जानेवारी यादिवशी लाखो अनुयायी येत असतात.(बार्टी) या संस्थेच्या वतीने अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थांना शैक्षणिक मदत व्हावी या हेतूने संस्थेला शासनाकडून विशेष निधी उपलब्ध होतो.
काही महिन्यांपूर्वी याच संस्थेमधील शेकडो विद्यार्थ्यांना मुंबई येथे आजाद मैदानात(बार्टी) संस्था व महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध आंदोलने करावी लागली, कारण त्यांना बार्टी संस्थेकडून शिष्यवृत्ती योजना देण्यास नाकारत होती. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता असताना सुद्धा आपल्या कडून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले होते. आणि अजूनही करत आहे. आजही बार्टीच्या बाहेर विद्यार्थी 86 दिवसापासून ( फेलोशिप ) मिळावी यासाठी उपोषण करत आहे. त्यांच्या शिक्षणासाठी पैसे देण्यास नकार आहे आणि दुसरीकडे गरज नसताना उधळपट्टी ही निंदनीय आहे. कुठल्या कायद्यानुसार शिक्षणाचे पैसे वळवण्यात येत आहे. असा थेट प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला, तिथल्या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च हा राज्यसरकारने करावा.
०१ जानेवारी २०२४ यादिवशी बार्टी संस्थे कडून ५०,००० हजार लोकांसाठी ६० लाख रुपयांचे जेवणाचे वाटप करण्यात येणार आहे.


संस्थेने एवढे लाखो रुपयांची उधळण का करावी? तसेच विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती कमी पडते याचा विचार संस्था का करत नाही? ज्या कारणांसाठी निधी आहे तो त्याच कारणांसाठी वापरला गेला पाहिजे. इतर ठिकाणी वापरणे हे विद्यार्थ्यांवर आर्थिक सामाजिक शैक्षणिक अन्याय केल्या सारखे होईल.
तातडीने संस्थेकडून होणाऱ्या ६० लाख रुपयांची उधळण त्वरित थांबवावी जर का बार्टीने खर्च केल्यास आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल. असे आमच्याशी बोलताना आप सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे म्हणाले

See also  बहुजन उद्धारक सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान दिन साजरा