बाणेर मध्ये प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहतूक काही काळ ठप्प नागरिक त्रस्त

बाणेर : बाणेर मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने बाणेर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

राधा चौक परिसरातील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती तसेच दोन तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

बाणेर परिसरामध्ये सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक विभागाच्या वतीने वाहतुकीचे नियोजन अभाव दिसत असल्याने वाहतूक कोंडी मध्ये अधिक भर पडत असल्याचे दिसत आहे.

सुमारे दोन ते चार किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्याने नागरिक त्रस्त झाले होते. गणराज चौक, बाणेर फाटा, बिट वाईज चौक आधी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉस्पिटल्स कडे जाण्यासाठी देखील नागरिकांना जागा उपलब्ध होत नव्हती. सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करत आहेत.

See also  विजयस्तंभ अभिवादन दिनी बार्टी उभारणार ३०० पुस्तक स्टाॕलचे दालन