ससाने नगर मधील मुख्य चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिग्नल व्यवस्था सुरू करावी

हडपसर : ससाणे नगर मधील मुख्य चौकामध्ये बसवण्यात आलेले सिग्नल सुरू करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

ससाणे नगर मध्ये रेल्वे गेट सुरू असताना रोज बारा ते पंधरा तास वाहतूक कोंडी होत होती त्यावेळेस सिग्नल बसवण्यात आले होते. परंतु भुयारी मार्ग चालू झाल्यानंतर ते सिग्नल बंद करण्यात आले. सिग्नल साठी जवळपास दहा लाख रुपये खर्च करण्यात आला होता. परंतु ही सिग्नल व्यवस्था कार्यान्वित नसल्यामुळे अनेकदा वाहन चालकांचा गोंधळ निर्माण होतो व वाहतूक कोंडी तयार होते. संध्याकाळच्या वेळेस ससाणे नगर मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि लोक नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे.

ससाणे नगर परिसरातील वाहतूक सिग्नल कार्यान्वित केल्यास काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होईल. वाहतूक विभागाच्या वतीने हा सिग्नल कार्यान्वित करावा व येथे वाहतूक नियमन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  औंध परिहार चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन