सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

धानोरी : सिद्धार्थ शिक्षण संस्था,भैरव नगर, धानोरी, पुणे यांचे गगनगिरी मंगल कार्यालय, धानोरी या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक पाटील व मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श नगरसेविका रेखाताई टिंगरे व समाजसेवक चंद्रकांत टिंगरे हे होते.

प्रमुख पाहुणे कार्यक्षम नगरसेविका सौ.रेखाताई टिंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलना सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उस्फूर्तपणे सहभागी झाले पाहिजे. अभ्यासाबरोबर अवांतर कला,क्रीडा सांस्कृतिक या गोष्टीमध्ये ही विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी नेहमी हे विद्यालय प्रयत्न करत असते. या विद्यालयाचा दहावीच्या निकालाची परंपरा उज्वल आहे. दरवर्षी या विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के असतो याचा सार्थ अभिमान या परिसरातील सर्व नागरिकांना आहे.


संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पाटील म्हणाले की, या विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संपूर्ण मदत केली जाते सर्व विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते या परिसरातील विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होऊन उच्च पदस्थ पदावर विराजमान होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. आदर्श नगरसेविका रेखाताई टिंगरे व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी नेहमी शाळेला सहकार्य करून प्रोत्साहन दिलेले आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनामिका कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून झाली.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या व संस्थेच्या प्रमुखांच्या शुभहस्ते वेदिका श्रीवास्तव, गौरी लोणकर, सानवी कांबळे इत्यादी विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला.

यावेळी शाळेतील श्री.विजय श्रीवास्तव, श्री. योगेश बिंदगे, श्री. अंबादास कांबळे, श्री. मारुती पाटील, श्री. विशाल वाघमारे, श्री. गौतम बोरकडे, श्री. मुकेश विधाते, श्री. संतोष परब, सौ. मनीषा चिंचणे, सौ. शुभांगी काळगुडे, सौ. तृप्ती कांबळे, सौ. प्रिया शेलार, सौ. ममता चौधरी, सौ. रुपाली पवार, सौ. तेजस्विनी देशमुख, सौ. रमाताई डंबारे, सौ. मानसी पलांडे, सौ. शीतल गायकवाड, सौ. ज्योती एडके, सौ. अर्चना बनछोड, सौ. सविता इमडे, सौ. सुरेखा टाकळे, सौ. सुर्वे वैशाली, सौ. सूर्यवंशी विदुला, सौ. चोपडे सुजाता, सौ. जाधव अपर्णा, सौ. सिंग मंजुषा, सौ. पानपाटील वैशाली, सौ. गायकवाड अनिता, सौ. भंडारी अनिता, सौ. गांगर्डे प्रिया, सौ. ठमके संध्या, सौ. करनी अश्रफ, सौ. यमुना, सौ. वर्गीस रुबीमोल, सौ. रय्यान शेख हे शिक्षक तसेच सौ. आरती कदम, सपना कांबळे, इतर पालक प्रतिनिधी व विद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बालेवाडी येथील हायस्ट्रीट -२चे उद्घाटन