पुणे : उप-मुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सुस रोड बाणेर येथील नोबलएक्स्चेंज कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत बंद आणि स्थलांतरित करणेबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत केली.
२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्किट हाउस येथे झालेल्या मीटिंग मध्ये पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार, पुणे जिल्हा अधिकारी श्री. राजेश देशमुख, माजी आमदार मेधा कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद श्री रमेश चव्हाण, PMRDA मुख्य अभियंता श्री. विवेक खरवडकर व सुस रोड येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
उप-मुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सुस रोड बाणेर येथील नोबल एक्स्चेंज कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत बंद आणि स्थलांतरित करणेबाबतदिलेल्या आदेशा दिले होते.सुस रोड, बाणेर येथील स्थानिक रहिवाश्यांसोबत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन हया जुन्या व दुर्लक्षित विषयावर सविस्तर चर्चा केली होती. यावेळी हा प्रकल्प महानगरपालिकेने २०१६ मध्ये सुरु केला असून आता येथील लोकवस्ती जवळपास ६००० झालेली आहे.
या प्रकल्पामुळे आजू बाजूच्या परिसरात सतत दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असते.२७ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (National Green Tribunal) कोर्टाने हा प्रकल्प बंद करून नवीन जागेत स्थलांतरित करावा व सदर जागा BDP क्षेत्र म्हणून वापरावी असा निकाल दिलेला आहे. नंतर पुणे महानगरपालिका नागरिकांच्या व NGT निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने पण हा प्रकल्प नागरीकांच्या हितासाठी व आरोग्यासाठी स्थलांतरीत करावा अशा सूचना पुणे महानगरपालिकेला ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या आहेत व नवीन जागा शोधण्यासाठी फक्त महिन्यांचा कालावधी दिलेला होता. परंतु महानगरपालिका गेल्या ३ वर्षांपासून वेळकाढूपणा करत असून सर्वोच्य न्यायालयात नेहमी हेच सांगत आहे कि त्यांच्या कडे जागा उपलब्ध नाही व नवीन जागा शोधून स्थलांतराचे पण काही प्रयत्न महानगरपालिकेकडून दिसत नाहीत.
कोर्टाचा निकाल व सूचना नागरिकांकडून असून सुद्धा पुणे महानगरपालिका मुद्दाम पर्यायी जागा शोधत नसून हा प्रकल्प सुरूच ठेवला आहे व सततच्या दुर्गंधी मुळे लहान मुलांना व येथील नागरिकांना खूपच त्रास होत आहे.
ह्या सगळ्या मुद्द्याची गंभीर दखल घेऊन वरील मान्यवरांच्या उपस्थितीत, आदरणीय पालक मंत्र्यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. कुणाल खेमनार हयांना हा कचरा प्रक्रिया प्रकल्प कुठलेही कारण न देता त्वरित म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत बंद व स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते, तसेच ३१ डिसेंबर नंतर स्थानिक रहिवासी हाच विषय परत घेऊन येऊ नयेत असा आदेशही अतिरिक्त आयुक्तांना दिले होते.
कचरा प्रकल्प ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत बंद करण्याचे आदेश असून सुद्धा महानगरपालिकेने २३ डिसेंबर २०२३ रोजी सर्विस रोड खोदुन या कचरा प्रकल्पासाठी पाण्याची लाईन जोडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. ह्या कृतीमुळे महापालिकेचा नक्की हेतू काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा कचरा प्रकल्प तातडीने मुदतीत हलविण्यात यावा अशी मागणी यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
घर ताज्या बातम्या पालिकेने पालकमंत्र्यांचे आदेशाचे पालन करत सुसरोड बाणेर येथील कचरा प्रकल्प बंद करावा...