कोथरूड मध्ये”एक सही मणिपूर हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधाची.. संतापाची..”

कोथरूड : पुणे शहरात महाविकास आघाडीच्या वतीने मणिपूर हिंसाचारात महिलांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत.मणिपूर मधील हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात “एक सही मणिपूर हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधाची.. संतापाची..”कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड गावठाण,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड या ठिकाणी करण्यात आले होते.

या प्रसंगी प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुशआण्णा काकडे,आमदार श्री.रवींद्र धंगेकर,माजी आमदार श्री. चंद्रकांत मोकाटे,राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, संगीताताई तिवारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक गिरीश गुरनानी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा, राम थरकुडे युवा सेना प्रमुख पुणे शहर, राज जाधव अध्यक्ष NSUI कोथरूड यांनी कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवकांचा व परिसरातील नागरिकांचा सहभाग घेत स्वाक्षरी केली.

See also  राष्ट्रीय निवडणूक समिती ला न सांगता तुम्ही पक्ष अध्यक्ष चे निवड कशी करू शकता - जितेंद्र आव्हाड