संगणकातील प्रोग्रॅम भाषा व संस्कृत भाषा हे एकमेकांशी जुळणारे आहेत – मा डाॅ पराग काळकर, प्रकुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माॅडर्न हायस्कुल मुलांचे आयोजित केलेल्या पूजनीय दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. ग्रामीण व शहरी या दोन भागात झालेल्या या स्पर्धा पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या स्तरावर घेण्यात आली. तसेच सांघिक व वैयक्तिक स्तरावरही घेण्यात आली.
या का्र्यक्रमामधे संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी अभिनव स्पर्धा गेली सात वर्ष घेणा्र्या माॅडर्न विद्यालयाचे व पी. ई.सोसायटीचे कौतुक डाॅ. पराग काळकर , प्रकुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी केले.

याप्रसंगी प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर म्हणाले, “संस्कृतही ज्ञान भाषा आहे. संगणकातील प्रोग्रॅम भाषा व संस्कृत भाषा हे एकमेकांशी जुळणारे आहेत.संस्कृत भाषा ही तुमचे उ्च्चार व भाषा शुध्द करते. या भाषेचा आभ्यास जर सातत्याने केला तर संवाद साधणे सोपे होते. म्हणून संस्कृत भाषेचा सतत अभ्यास करत रहा”


हे या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. संस्कृत भाषेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शहरीभागात वारजे,गणेशखिंड,शिवाजीनगर,निगडीत तर ग्रामीण भागात भोर, खेड, आळंदी या भागात घेण्यात आल्या. याचे कौतुक करताना पी ई सोसायटीचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन र. एकबोटे यांनी हि स्पर्धा पूर्ण महाराष्ट्राभर होईल व संस्कृत भाषा विद्यार्थ्यांना समृध्द करेल असे विचार मांडले.
या वर्षी या स्पर्धेत अंदाजे ३००० विद्यार्थी(५०० पेक्षा जास्त ग्रामीण भागातून) व १०० पेक्षा जास्त शाळा सहभागी झाल्या.
यामधे प्रथम बक्षिसाला संस्कृत पंडित शहाजीराजे भोसले
द्वितीय बक्षिसाला संस्कृतप्रेमी शिवाजीराजे भोसले तर
तृतीय बक्षिसाला संस्कृत विद्वान लेखक संभाजी राजे भोसले ही आदरयुक्त नावे अयोजकांनी दिले.
ही स्पर्धा मा स्व श्री पूजनीय दादासाहेब एकबोटे यांच्या नावे घेण्याची कल्पना ही एकबोटे कुटूंबियांची असुन या स्पर्धेचा पुर्ण आर्थिक भार एकबोटे कुटुंबिय उचलतात असे माॅडर्न विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रोहिणी काळे प्रास्ताविक करताना म्हणाल्या.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक विजेते खालील प्रमाणे
१. पूर्व प्राथमिक : लहान गट : श्र्लोक पाठांतर : सुमोघ रामदास वामणे, श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर (ग्रामीण)
२. ऒहिरी पटवर्धन, गोळवलकर शाळा (शहरी)

मोठा गट : सुर्याष्टक : १.माही गजानन कीरोचे, श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर (ग्रामीण)
२.श्राव्या शैलेश राणीम, हुजुरपागा,लक्ष्मी रोड (शहरी)

प्राथमिक : १ व २री : प्रज्ञाविवर्धन स्त्रोत :
१. आर्या अमृत शिवभक्त, जिजामाता विद्यालय, भोर (ग्रामीण)
२.श्राव्या कलोती, बाल शिक्षण इंग्रजी माध्यम(शहरी)

३ व ४ थी : कालभैरवाष्टक :
१. श्लोक सागर ढवळे, जिजामाता विद्यालय, भोर (ग्रामीण)
२. गार्गी गाडगीळ, गोळवलकर शाळा (शहरी)

माध्यमिक : ५ ते ७ वी : नर्मदाष्टक, संस्कृत गीत : १. अधिराज राहुल दिघे, जिजामाता विद्यालय,भोर (ग्रामीण)
२. सीता राणा, १०१ जी म.न.पा शाळा (शहरी)

८ ते १० वी : देवीसुक्तम, भगवतगीता श्लोक( अध्याय २ रा १ ते २०)
१. चैतन्य गणेश गोरे श्री ज्ञानेश्वर विद्यालय (ग्रामीण)
२. आर्या पटवर्धन, अभिनव विद्यालय (शहरी)

उच्च माध्यमिक : ११ ते १२ वी : महिषासुरमर्दिनी स्तोत्र, भगवतगीता श्लोक( अध्याय ८ वा )
१. वैष्णवी कदम, माॅडर्न महाविद्यालय, निगडीत (शहरी)

या शिवाय ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुहगीत स्पर्धा (वंदेमातरम) घेण्यात आली. यात फर्गुसन महाविद्यालय विजयी झाले.

कार्यक्रमाची सुरवात सौ क्षिप्रा पंढरपुरकर मॅडम यांच्या ईशस्तवनाने झाली. पाहुण्यांचा परिचय श्री मिलींद कुलकर्णी सर यांनी करुन दिला.गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन सौ ईशानी ढेरे व सौ. शुभांगी घेवडे मॅडम यांनी केले. सुत्रसंचालन श्री सतिश लिंबेकर सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री मिलिंद एकबोटे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी पी ई सोसायटीचे सचिव प्रा शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर, उपकार्यवाह डाॅ निवेदिता एकबोटे, डाॅ प्रकाश दिक्षित,श्री चित्तरंजन कांबळे, श्री अजित वडगावकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी, श्री नंदुकिशोर एकबोटे, सौ वंदना एकबोटे, प्राचार्य डाॅ संजय खरात, नियामक मंडळाचे सदस्य, संस्थेचे सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  मृणाल सुमित गायकवाड यांना 'रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डस्'च्या ब्रँड अँबेसॅडर पदाचा बहुमान!