कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय, पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “१ जानेवारी – २०२५ स्वच्छतेचा संकल्प दिन” साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गांवठाण आरोग्य कोठीच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२५” व ” सफाई सैनिकांच्या वतीने सर्व स्वच्छता प्रेमी नागरिकांना नुतन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव व नव्या संकल्पनेचा निर्धार करून भारत मातेला विशेषतः पुणे शहराला स्वच्छ, सुंदर, हरित आणि कचरा मुक्त करण्यासाठी नव्या कल्पना, नव्या आशा, नवे विचार, नवे उपक्रम, नवी मानसिकता बदलण्याचा नविन वर्षाचा एक आदर्श संकल्प करण्याची शपथ घेणे.”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रम डहाणूकर कॉलनीतील गोल सर्कल स्व. वामनराव डहाणूकर उद्यान येथे पार पाडण्यात आला. समाजात जीवन जगताना अनेक व्यक्ती नविन वर्ष आले की,” काहीशा बऱ्याच घरातील कर्त्या व्यक्ती मी दारू सोडणार, तंबाखू , गुटखा व पान खाणार नाही, विढी सिगारेट पिणार नाही तसेच घरातील मुलं मी चांगला अभ्यास करणार, दररोज शाळेत जाणार, वर्गपाठ करणार, मोबाईल वापरणारा नाही शिवाय महिला वर्ग मी मिसेरी लावणार नाही, अशा अनेक व्यक्ती काही ना काही तरी संकल्प करत असतात. काही जन संकल्पनेच्या निर्धार करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. पण कोथरूड मधील स्वच्छता प्रेमी व्यवसायिक धारक, पथारीवाले, हातगाडीवाले, भजी व फळविक्रेते मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ” ओला व सुका कचरा वेगळा करणे, उघडयावर व नदी नाल्यात, रिकाम्या फ्लॉट मध्ये कचरा टाकणार नाही, उघड्यावर लघू शंका करणार नाही तसेच सार्वजनिक रस्त्यावर थुंकणार नाही, स्वच्छतेसाठी आठवड्यातून दोन तास देणार अशा प्रकारे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छतेसाठी नविन वर्षाचे नवे संकल्प करून शपथ घेण्यात आली. सदर १ जानेवारी – २०२५ हा दिवस स्वच्छता संकल्पना दिन म्हणून म्हणून साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तसेच आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, गणेश साठे, हनुमंत चाकणकर मोकादम वैजीनाथ गायकवाड, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, गणेश चव्हाण, आण्णा ढावरे प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक, साईराज दुबळे, रोहन जाधव, सलीम पठाण, ऋषीकेश भालशंकर तसेच सेवक परेश कुचेकर, कुणाल जाधव, प्रविण कांबळे, सुरेश कंधारे, चंद्रकांत धोत्रे, शरद वावळकर,अभिषेक गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले. तसेच या संकल्प दिनाच्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे उपप्रंतपाल किरण इंगळे, सामाजिक कार्यकर्ते बाळू दांडेकर, सौदागर शिंदे व्यवसायिक रवि पाटील, तसेच तेथील व्यापारी संघटनेचे शशिकांत उभे, स्वच्छ संस्थेचे सोहन खिलारे, सेवासहयोगचे युवराज चाबुकस्वार, मंदार जाधव व इतर नागरिकांनी स्वच्छता संकल्पनेची शपथ घेतली.