डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बोपोडी : बोपोडी भागातील सर्वात जुनी असलेली लोकप्रिय शाळा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेचा 2023- 2024 चा वार्षिक स्नेह सम्मेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विशेष उपस्थिती माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. शिक्षणाधिकारी माध्य. मा.आशा उबाळे, प्रमुख पाहुणे बालसाहित्य व कथा निवेदक मा. दिलीप गरुड, उपजिल्हाधिकारी माध्य. तांत्रिक शिक्षण मा.दामोदर उंडे, शाला प्रमुख राजश्री मांढरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन घोंगडे, कार्याध्यक्ष गणेश धालपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शालेय विद्यार्थीनीनि आरोग्य आणि स्वच्छता या वरती नाट्यछटा सादर करण्यात आली या मध्ये प्रमुख कलाकार प्रियांका जीवन घोंगडे अस्मिता थोरवे, सुप्रिया काची, समरिन इनामदार यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श विद्यार्थिनी म्हणून सोनाली उबाळे हिचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन निशा गार्डी म्यॅडम आणि आभार खटके सर यांनी मानले.

See also  स्नेहांकुर द रे होप या सामाजिक संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य वह्या वाटप