मनपा कंत्राटी कामगारांच्या नाम फलकाचे उद्घाटन

पुणे: पुणे महानगरपालिकेतील येरवडा विभागातील राष्ट्रीय मजदूर संघाच्या सभासद असणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या नामपालकाचे उद्घाटन कामगार नेते व राष्ट्रीय मतदार संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे कंत्राटी सफाई कामगार संघटक शरद भाकरे यांनी केले यावेळी बोलताना कामगार नेते सुनील शिंदे म्हणाले कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतील अधिकारी उदासीन असून संघर्ष करूनच कंत्राटी कामगारांना हे प्रश्न सोडवावे लागतील त्यासाठी सर्व कंत्राटी कामगारांची एकजूट ही अत्यंत महत्त्वाची आहे संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण सेक्रेटरी एस के पळसे विजय पांडव बाबा कांबळे रवींद्र आगम जानवी दिघे धुळेकर ताई उज्वल साने मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार उपस्थित होते

See also  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र भुतडा यांची नियुक्ती