बालेवाडी : आयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त बालेवाडी येथे संजय बालवडकर, नंदिनी गोशाळा बालेवाडी यांच्या वतीने सोहळा निमित्ताने महाप्रसाद जिलेबीचे दिवसभर वाटप करण्यात आले.
बालेवाडी येथे संकल्प प्रतिष्ठान व नंदिनी गोशाळा यांच्या वतीने श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालेवाडी परिसरातील भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेत आनंदोत्सव साजरा केला.