बालेवाडी येथील कचरा वर्गीकरणाच्या शेडला आग

बालेवाडी : साई चौकाजवळील कचरा वर्गीकरणाच्या शेडला मोठी आग लागली. बालेवाडी मुख्य रस्त्यावर असलेल्या कचरा वर्गीकरणाच्या शेडला मोठ्या प्रमाणात आग लागली यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळत होते.
तसेच आजूबाजूच्या रहिवाशांनी स्फोट ऐकू येत होते.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. या परिसरामध्ये पुणे मेट्रोचे काम सुरू असून मुख्य रस्त्यावर असलेल्या या कचरा डेपोला आग लागल्यानंतर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी हा रस्ता बंद केला होता.

रात्रीच्या दरम्यान ही आग लागल्यामुळे परिसरात लांबूनच आगीच्या ज्वाला व धुराचे लोट पाहायला मिळत होते. यामुळे नागरिकांची गर्दी झाली होती.

उन्हाळ्यामध्ये कचरा वर्गीकरण करणाऱ्या शेड्स मध्ये आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने कचरा वर्गीकरण शेड्सवर आग विझवण्यासाठी अग्निशामक उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

See also  रेन हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी व्हावी जुन्या विहिरी जतन करा - आ. सिद्धार्थ शिरोळे