मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

सातारा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.

याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.डूडी यांनी किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती देऊन येथे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
या प्रसंगी आई भवानी मातेची पूजा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली

See also  मानवी युवा विकास संस्था व हडपसर पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा "संदीप जगदाळे स्मृती पुरस्कार" पत्रकार श्रीकिशन काळे व पत्रकार मिकी गई यांना जाहीर