कोथरूड येथील कचरा वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांच्या समस्या उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहोचवणार – विजय डाकले

कोथरूड : कोथरुड भागातील वेगवेगळ्या अपार्टमेंट, वसाहती येथे घरोघर स्वखर्चाने स्वताचा टेंम्पो गाडी घेऊन जाऊन कचरा गोळा करुन पालिकेच्या कचरा डेपो मध्ये जमा करणा-या कचरा वेचकांची कोथरूड डेपो मध्ये होत असलेली अडवणूक करण्यात येऊ नये अशी मागणी विजयबापू डाकले यांनी केली.

कोथरूड परिसरातील सोसायट्यांचा कचरा संकलित करणारे व पालिकेचे कुठलेही मानधन न घेता पुणेकरांची सेवा करणा-या १०० पेक्षा जास्त टेम्पो चालकांनी त्यांच्या अडचणी व समस्या याबाबत विजयबापु डाकले यांची भेट घेतली. कचरा भरुन आलेल्या गाड्या डेपोत सोडण्याबाबत अडवणुकीची भुमिका घेणा-या पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांशी बापुंनी संपर्क केला. कचरा डेपो मध्ये येणाऱ्या गाड्यांची अडवणूक करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच कोथरूड कचरा डेपोचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात यावे हा कचरा डेपो बंद करण्यात येऊ नये. तसेच या परिसरातील दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना या संदर्भामध्ये भेट घेऊन या कचरा वेचकांच्या समस्या सोडवण्याबाबत मागणी करणार असल्याचे यावेळी विजय डाकले यांनी सांगितले.

See also  जैन विचार मंचच्या वतीने 'आहार दिन' निमित्त 'ऊसाचे रसपान'