नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून देशात १९ एप्रिल ते १ जून या दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात २६ एप्रिल ते २५ मे या दरम्यान पाच टप्प्यांत निवडणूक पार पडल्या जातील.
लोकसभा निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी ४ जूनला लागेल. निवडणुकीच्या संदर्भातील ही घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केली.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३मे आणि २० मे या तारखांना एकूण पाच टप्प्यांत मतदान होईल.
तारीख आणि त्या दिवशी मतदान होणारे मतदारसंघ पुढीलप्रमाणे
१९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
२६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
७ मे – रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
१३ मे – नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
२० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई-उत्तर, मुंबई – उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व), मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई