समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या लोगोचे अनावरण

पाषाण : समाज भूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याच्या निमित्ताने पाषाण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर व सोहळ्याच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मृदुंगमणी पांडुरंग आप्पा दातार तसेच पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी बाणेर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी सिम्बॉयसिस हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्त संकलित करण्यात आले. यावेळी पाषाण परिसरातील डॉक्टरांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे स्टिकर वितरित करण्यात आले. तसेच सोहळ्याच्या निमित्ताने होत असलेल्या विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

See also  दगडूशेठ मंडळाचा पुढाकार भविष्यात विसर्जन मिरवणुकीला दिशा देणारा ठरेल- पालकमंत्री पाटील