महात्मा सोसायटी कोथरूड जवळील हिल व्ह्यूव सोसायटी मध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
कोथरूड कोथरूड हिल व्ह्यूव सोसायटी मधील नागरिकांशी माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी संवाद साधला. सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून सोसायटीच्या परिसरामध्ये असलेल्या अनेक समस्यांचा पाढा यावेळी नागरिकांनी वाचला. महात्मा सोसायटी मधून येताना असलेले 16 हुन अधिक स्पीडब्रेकर असल्याने वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे व दुचाकी स्वारांचे स्पीड बेकर व्यवस्थित नसल्यामुळे अपघात झाले आहे.
याबाबत वारंवार प्रशासन व शासनाकडे तक्रारी करून देखील कारवाई करण्यात आली आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देखील तक्रारी करूनही अद्याप योग्य दखल घेण्यात आली नाही. सोसायटीतील नागरिकांच्या प्रश्नांची योग्य दखल घेतली जात नसल्याने याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.