समाज कल्याण विभागाच्यावतीने कर्ज मंजुरी मेळावा संपन्न

पुणे : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कर्ज प्रकरण मंजूरी देण्याबाबत मेळावा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे संपन्न झाला.

यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी मांजरे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अमोल शिंदे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत आदी उपस्थित होते.

श्री. कारेगांवकर यांनी कर्ज प्रकरणाच्या मंजुरीबाबत आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करुन बँकेच्यावतीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे प्रत्येकी २७ अर्जदार व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे १४ अर्जदार उपस्थित होते. महामंडळांमार्फत शिफारस केलेल्या कर्जप्रकरणाबाबत संबंधित बँकेच्या समन्वयकांनी मार्गदर्शन केले तसेच कर्ज प्रकरण मंजुरीबाबत कार्यवाही केली.

See also  'साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२४' जाहीर