विद्यार्थ्यांनी कौशल्याचे ब्रँडिग केले पाहिजे – डाॅ निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, पी ई सोसायटी

पुणे: गणेशखिंड येथिल माॅडर्न महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागातर्फे interaction 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. सन्माननीय अतिथी डॉ दीपक शिकारपुर आय.टी. विशेषज्ञ, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डाॅ निवेदिता एकबोटे व डाॅप्रकाश दिक्षीत उपकार्यवाह पी.ई. सोसायटी हे उपस्थित होते.


मा डाॅ निवेदिता एकबोटे यांनी आपल्या बोलताना विद्यार्थ्यांना सांगितले की, अभियांत्रिकीच्या कॉलेजच्या दिवसात त्या अशाच कार्यक्रमामध्ये भाग घ्यायच्या .विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्याचे ब्रँडिंग केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
डॉ दीपक शिकारपूर म्हणाले, कम्पुटर भाषा मध्ये आगामी काळ संधींनी भरलेला आहे आणि त्यांनी पदवी बरोबर ज्ञान आणि कौशल्य आणि इंटर्नशिप यावर भर द्या. याशिवाय विद्यार्थ्यांनी पॅशन+ प्रोफेशन+ एक्सलन्स मध्ये उत्कृष्टता दाखवली पाहिजे व अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विविध गोष्टी शिकल्या पाहिजेत.
२०००साली या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मीच होतो २४ वर्ष सतत चाललेल्या या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.


प्राचार्य डॉ.संजय खरात यांनी interaction साठी खूप आनंद व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.महाविद्यालय असे कार्यक्रम कौशल्यवाढीसाठी घेते असे ते म्हणाले.
तसेच प्रसंगी मॉडर्न महाविद्यालयाने बी.एस्सी.डेटा सुरक्षा हा नविन अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र 2024 पासुन सुरु केला अशी माहिती त्यांनी दिली.
या वर्षीही कार्यक्रमाला २५ महाविद्यालये व ६००+ विद्यार्थी यांची नोंदणी झाली असुन पुढील दोन दिवसात विद्यार्थी १०००+ होतील अशी माहिती विभाग प्रमुख डाॅ शुभांगी भातांब्रेकर यांनी दिली.
यानंतर दोन दिवसात विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत ब्रेन बॅटला, गेमर स्ट्राईक, हरकत इन द डार्क, क्रिएटीव्हीटी क्लब, क्वांटम असेंबलर, विझडम वाॅर, गोल्ड रस क्वेस्ट, क्विक रील इ या स्पर्धामधे विद्यार्थी
https://interaction24.moderncollegegk.in/
या क्लिकवरुन रजिस्टर करु शकतात.
हि वेबसाईट आँन लाईन रजिस्ट्रेशन साठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केली आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचलन हिमानी ठोंबरे व शिफा खान या विद्यार्थ्यांनी केले. Interaction चे संयोजन प्रा पूजा बहिरट व प्रा प्रेरणा शेरला यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

See also  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाच्या कामांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली पाहणी