पुणे : जन संघर्ष समिती पुणे यांच्या वतीने पुणे शहरा मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेतील संकल्पना व ठोकताळे या विषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या जनजागृती मोहिमेद्वारा संभाजी उद्यान पुणे येथे पाहिल्या भागात सरकारशी संगनमताने चालणारी शोषकांची भांडवलशाही (क्रोनी कॅपिटालिस्म) या विषयीच्या श्री अभिजित राजेभोसले यांनी संकलित केलेल्या क्रोनी कॅपिटालिस्म या पुस्तिकेच्या सुरवातीच्या प्रतींचे वितरण जन संघर्ष समिती चे अध्यक्ष ॲड. श्री रवींद्र रणसिंग व सहकारी श्री विट्ठल सातव, श्री सुधीर पाषाणकर ॲड. श्री विकास देशपांडे, ॲड श्री संदीप ताम्हणकर, श्री किशोर सरदेसाई, श्री अभय चव्हाण, श्री संतोष पवार, श्री योगेश माळी, श्री प्रकाश भारद्वाज, ॲड श्री मोहन वाडेकर, श्री विलास सुरशे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लोकशाही व्यवस्था असलेल्या देशाची आर्थिक प्रगती होत असताना त्यामधून मिळणारा फायदा देशाचे सर्व नागरिक, देशातील भांडवलदार वर्ग तसेच शासन व्यवस्था या सर्वांना त्याचा लाभ झाला पाहिजे व देशाची एक समृद्ध व सशक्त अर्थव्यवस्था निर्माण झाली पाहिजे असे आर्थिक धोरण राबवणे अपेक्षित असते.
लोकशाही सरकार जर भांडवलदार वर्गाच्या हातात दिले तर जनतेला गुलामगिरीत मारावे लागते असे निरीक्षण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नोंदवून ठेवले आहे.
सदर पुस्तके मध्ये भारताच्या वाढणाऱ्या अर्थव्यवस्थे मध्ये भांडवलदार वर्ग कश्या प्रकारे आपली मक्तेदारी निर्माण करून एकछत्री अंमल निर्माण करत आहे याचा उहापोह केला आहे.
भांडवलदार वर्गाने सरकार बरोबर संगनमत करून फक्त स्वतःच्या फायद्याची आर्थिक धोरणे आखून घेवून फक्त स्वतःचाच फायदा व्हावा यासाठी जनतेच्या क्रयशक्तीचा वापर करून घेणे असे चालवले आहे. डॉ बाबासाहेब यांनी नोंदवलेल्या निरीक्षणाची प्रचिती येण्याची सुरुवात झाली आहे असे जाणवतेय.
देशाच्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही आर्थिक जनजागृती मोहीम पुणे शहर येथे राबवली जात आहे. पुणे शहरातील नागरिक या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणत आपला सहभाग नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.