‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन ‘घरोघरी तिरंगा’ फडकवून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयावर तसेच नागरिकांनी आपल्या घरावर १५ ऑगस्टपर्यंत तिरंगा ध्वज फडकावून शासनाच्या विविध कार्यक्रमामध्ये उस्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पितळे व सार्वजनिक आस्थापना तसेच खाजगी आस्थापनाचे कार्यालय, कारखाने व दुकाने व घरे आदी ठिकाणी तीन दिवसाच्या कालावधीत राष्ट्रध्वज यथोचित सन्मानाने फडकवण्यात यावा.

प्रत्येक शासकीय आस्थापनाने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान सूर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकवणे व सूर्यास्तापूर्वी राष्ट्रध्वज उतरविणे बंधनकारक राहील. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयांनी १५ ऑगस्ट रोजीचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

See also  मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत-अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड