किल्लेदार भाजी मार्केट सुसज्ज करा आमदार शिरोळे यांची सूचना

पुणे : जनवाडी येथील बी.डी किल्लेदार भाजी मार्केट येथे प्रत्यक्ष पाहणी करून हे मार्केट सुसज्ज आणि आधुनिक करा,अशा सूचना आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

महापालिकेचे भाजी मंडई अधिकारी, भवन रचना विभाग अधिकारी व मालमत्ता अधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत सर्व माहिती घेऊन मार्केट इमारतीची दुरावस्था आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना दाखविली.गेल्या पाच ते सात वर्षांपासून बिल्डिंग बांधून आहे पण त्याचा उपयोग होत नव्हता. योग्य तो उपयोग व्हावा यासाठी प्रशासनासह पाहणी केली ,असे आ. शिरोळे यांनी सांगितले.

त्यावेळी गणेश बगाडे, किरण ओरसे,प्रकाश सोळंकी,विनोद धोत्रे, माजी नगरसेवक लक्ष्मण लोखंडे, लक्ष्मण नलावडे, सुरेश शिंदे, रमेश भंडारी आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

See also  कसबापेठ विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन