विधाते वस्ती बाणेर येथील मनोज दळवी यांचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश

बाणेर  : कोथरुड मतदारसंघातील सानेवाडी औंध व विधाते वस्ती बाणेर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी कॉंग्रेसचे मनोज दळवी यांनी आपल्या समर्थकांसह कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जगात सर्वाधिक सदस्यता असलेला भारतीय जनता पक्ष आहे. एवढी मोठी ताकद असूनही, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे अनेक नवनवीन नेतृत्व पक्षाशी जोडली जात आहेत. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि तेच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर दत्ता गायकवाड, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रवी साळेगावकर, सुनील पांडे, कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, राहुल कोकाटे, वैभव विधाते, सनी निम्हण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

See also  पुणे बुलेटिन न्यूज पोर्टलचे उद्घाटन