पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यशवंत बँक आणि वाई बँक या दोन्ही बँकांसंदर्भातली वस्तूस्थिती सांगून पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खासदार मेधा कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांसह निवेदन दिले.
यावेळी यशवंत बँकेचे पीडित गुंतवणूकदार व वाई बँकेचे सद्यस्थितीतील पदाधिकारी उपस्थित होते.वाई अर्बन बँक 2011 ते 2023 या कालावधीमध्ये केलेल्या गैरव्यवहारा संदर्भात माहिती निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना देण्यात आली. वाई अर्बन बँक 104 वर्षांपूर्वीची जूनी बँक असून पहिल्यापासून संघ विचाराची संबंधित आहे, परंतु 2011 पासून काँग्रेस व संघातील काही लोकांनी एकत्र येऊन बँक ताब्यात घेतली व त्यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून NPA वाढवले आहेत व मोठ्या प्रमाणात अनियमीत कर्ज पुरवठा केल्यामुळे बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे विशेष लेखा परीक्षा का मार्फत चौकशी करून बँकेच्या माजी संचालकांविरुद्ध कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या आहेत. यामध्ये 86 कोटी 51 लाख 74 हजार रूपयांचा संगनमताने अपहार केल्याचे सिद्ध होत आहे. असा आरोप करण्यात आला आहे. या सर्व घटनांमध्ये तात्कालीन अध्यक्ष डॉ. विनय जोगळेकर 2011 ते 2016 तात्कालीन अध्यक्ष सी. व्ही. काळे 2016 ते 2023 या काळात हा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे बँक अडचणीत आली असून लाखो ठेवीदार सभासद देशोधडीला लागणार आहेत.
2023 साली नवीन संचालक मंडळ आल्यानंतर 268 कोटी असणारा NPA 133 कोटी पर्यंत आला आहे. परंतु आत्ता वसुलीसाठी असणारा NPA भ्रष्टाचार सर्व गैरप्रकाराने दिला आहे. त्यामुळे वसुली होत नाही. या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या संचालक मंडळात कारवाई होणे आवश्यक आहे तरी जिल्हा विशेष लेखा परीक्षकाने केलेल्या तपासाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी.
सहकार खात्यामार्फत चालू असलेल्या कारवाईबाबत राजकीय दबाव आणून स्टे आणण्याचा प्रयत्न चालू आहे याबाबत संबंधीतांवर कडक कारवाई करावी. तसेच कराड येथील दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये झालेला मोठा आर्थिक गैरव्यवहाराबाबत देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली.