बालेवाडीत कष्टकरी राजा फार्मर्स मार्केट, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत शेतकरी आठवडे बाजार

बालेवाडी : राहूल बालवडकर यांच्या संकल्पनेतुन आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुरस्कृत, कष्टकरी राजा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आयोजित, कष्टकरी राजा फार्मर्स मार्केट अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी ग्राहकांच्या भल्यासाठी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या योजने अंतर्गत शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते. कृषिभूषण, कृषिरत्न, डॉ.बुधाजीराव मुळीक यांच्या शुभहस्ते या आठवडी बाजाराचे  उद्घाटन करण्यात आले.

या वेळी  कृषिरत्न, कृषीभूषण, डॉ. बुधाजीराव मुळीक, सौ.पुनमताई विधाते, सौ. ज्योतीताई बालवडकर, सौ.सरलाताई चांदेरे,संजय बापू बालवडकर, अनिल बालवडकर, बालेवाडी गावचे माजी सरपंच अंकुश बालवडकर, माजी सरपंच गणपत बालवडकर, मोरेश्वर नाना बालवडकर, माणिक भाऊ गांधीले, प्रकाश तात्या बालवडकर, नितीन कळमकर, महादेव चाकणकर, शेखर सायकर,  सौ.सायली शिंदे, सौ सुषमा ताम्हाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुणे जिल्हातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतामाल या आठवडी बाजारात आणून एकदा अवश्य भेट द्यावी. आणि कोणत्याही व्यापाऱ्या शिवाय आपला माल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करावी. या द्वारे शेतकरी वर्गाला आणि ग्राहकांना देखील फायदा होणार आहे.

See also  बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन