बाणेर : बाणेर येथील “नंदन प्रोस्पेरा गोल्ड” या सोसायटीमध्ये “सोलर पॅावर जनरेशन प्लांट” चा शुभारंभ माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
या सोलर पॅावर प्लांटमुळे सोसायटीच्या सुमारे २ लक्ष रुपयांचा विजबिलावरील मासिक खर्चाची बचत होणार असुन अशा प्रकारे “सोलर पॅावर प्लांट” उभारणारी नंदन प्रॅास्पेरा गोल्ड हि बाणेर-बालेवाडी भागातील ३ री सोसायटी आहे.
सदर प्रकल्प उभारणीस सोसायटीला ७० लक्ष रुपये खर्च जरी आला असेल तरी या खर्चाचा परतावा सोसायटीला पुढील ३ वर्षांमध्ये या होणार्या बचतीच्या माध्यमातुन मिळणार आहे. त्यानंतर सोसायटी अंतर्गत लिफ्ट, कॅामन लाईट्स, वॅाटर पम्प अशी विजेवरील सर्व उपकरणे १००% सोलर प्रकल्पावर कार्यान्वयीत होतील. सदर प्रकल्प उभारण्यास शासनमार्फत २०% अनुदान देखिल मिळत असुन याअंतर्गत राज्यामध्ये ३२०० हुन अधिक सोसायटींमध्ये असे सोलर एनर्जी प्लांटची उभारणी केलेली आहे. तसेच यातुन सुमारे ५२ मॅगाव्हॅट विजेची निर्मिती या सर्व सोलर प्रकल्पांमधुन सोसायटींकरीता होत आहे.
निश्चितच अशा प्रकल्पांमुळे पर्यावरण व परिसराला फायदा होणारच आहे परंतु असे प्रकल्प उभारणार्या सोसायटीतील प्रत्येक सदनिका धारकास महानगरपालिकेच्या वतीने करामध्ये देखिल ५% सवलत उपलब्ध आहे. यामधुन निश्चितच मोठ्या प्रमाणात विजेवरील खर्चाची बचत झाल्याने अशा मोठ्या सोसायटींचे आर्थिक गणित देखिल सुरळित होणार आहे.
तसेच या नंदन प्रोस्पेरा सोसायटीमध्ये या सोलर पॅावर जनरेशन प्लांट सोबतच रेन वॅाटर हार्वेस्टिंग प्रकल्प व वेस्ट गार्बेज मॅनेजमेंन्ट अशा प्रकारचे प्रकल्प देखिल राबविले जात आहेत.
यावेळी माझ्यासमवेत नंदन बिल्डकॅानचे चेअरमन श्री.शामजी कोतकर व सोसायटीतील सभासद उपस्थित होते.