मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आप यांची मागणी

पुणे : पुणे शहराची जीवनदायीनी असलेल्या मुळा मुठा नदीची प्रदूषणामुळे जी दुरावस्था झाली आहे त्याची आम आदमी पक्षाच्या वतीने दोन दिवसापूर्वी पाहणी करण्यात आली होती तसेच पाहणी करते वेळी आम आदमी पक्षाच्या वतीने नदीचे पाणी बाटल्यांमध्ये भरून ते पुणे महानगरपालिका आयुक्त, पुण्याचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी घेतले होते. मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेले असता त्यावेळी त्यांची आयुक्तांशी भेट होऊ न शकल्याने, गुरुवारी पुन्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले होते.

आयुक्तांशी झालेल्या भेटीत आत्तापर्यंत मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाबाबत, जयका प्रकल्प बाबत श्वेत पत्रिका काढावी तसेच येत्या सात दिवसात पत्रकार परिषद घेऊन नदी सुधार प्रकल्पाबाबत ची माहिती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केली.

राम नदी बाबत अनेक तक्रारी, पाठपुरावा केला, वेळ पडली म्हणून MPCB आणि NGT यांना तक्रार केली. एकंदरीतच पुणे महानगरपलिकेने खोटे पुरावे, दस्तावेज NGT मध्ये सादर केल्याचे उघड झाले आहे. इतके असूनही आम्ही पालिकेला सहकार्य करून नद्या स्वच्छ करणार आहोतच असे कुणाल घारे यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तांच्या वतीने आम आदमी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सकारात्मकतेने घेण्यात आले असून, आम आदमी पक्षाने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले आहे असे कुणाल घारे यांनी सांगितले.

आम आदमी पक्ष चे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, कुणाल घारे, सचिव अमोल मोरे, प्रभाकर कोंढाळकर, शिक्षक आघाडी अध्यक्ष शीतलताई कांडेलकर, शंकर थोरात, कुमार धोंगडे, सुनील भोसले, किरण कांबळे, उमेश बागडे, आसिफ मोमीन, अविनाश भाकरे, गणेश थरकुडे, हृषिकेश मारणे उपस्थित होते.

See also  बाणेर बालेवाडीत स्मार्ट सिटी ने लावलेल्या विद्युत पोल पासून सावधान असे बोर्ड लावण्याची नागरिकांवर वेळ