मुळशीतील मोठा खोऱ्यात मोफत आरोग्य शिबिर

मुळशी : शेट ताराचंद हॉस्पिटल, रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक विद्यालय रास्ता पेठ टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप सात दिवसीय आरोग्यं शिबिराचे उद्घघाटन प्राचार्य डॉ सरोज पाटील, प्राचार्य डॉ मिहिर हाजरनविस, डॉ इंदिरा उजागरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी नामदेव टेमघरे रामचंद्र भरेकर महाराज, पाखरे महाराज निवृत्ती मारणे, सरपंच शंकरराव मारणे, युवासेना तालुका अधिकारि रामभाऊ गवारे उपसरपंच शिवराज शिंदे, विभाग प्रमुख माऊली साळेकर, वैभव पवळे उपस्थीत होते. या शिबिरात डॉ मधुरा कुलकर्णी, डॉ जयदीप गांगल, डॉ सायली कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  विद्यार्थी प्रतिनिधी हर्ष जैन यांनी सांगितले, भोडे, वातुंडे, माळेगाव, आंदगाव, खरावडे या ठिकाणी प्रत्येक घरी जावून विद्यार्थी ग्रामस्थांची तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. डॉ सरोज पाटील यांनी माहिती दिली कुठल्या प्रकाराची शस्त्रक्रिया कमी दरात कऱण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजक पुणे जिल्हा युवासेना अधिकारि अमित कुडले यांनी केले तसेच आभार देखिल मानले मुठा विभागात प्रथमच हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खारवडे देवस्थान यांच्या वतीने विद्यार्थी यांची राहण्याची व्यवस्था केली.

See also  डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन