प्रभाग क्रमांक ९ बाणेर मध्ये ज्योती चांदेरे यांचा घरोघरी प्रचार; नागरिकांशी थेट संवाद

बाणेर, पुणे प्रतिनिधी —प्रभाग क्रमांक ९ सूस–बाणेर–पाषाण मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ज्योती चांदेरे यांनी बाणेर परिसरात नागरिकांच्या घरोघरी भेटी देत प्रचार केला.

प्रचाराची सुरुवात बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर परिसरातील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा व विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.

या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले प्रश्न व अपेक्षा मांडल्या. आगामी काळात सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार ज्योती चांदेरे यांनी यावेळी व्यक्त केला.

See also  समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशन व विविध कार्यक्रमांचे आयोजन