पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ह्यांचा पोलीस मित्र संघटने तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव

पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ह्यांचा  महाराष्ट्र राज्य  पोलीस मित्र संघटनेचे  अध्यक्ष  राजेंद्र  कपोते यांच्या  हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव  करण्यात आला . पोलीस आयुक्त कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांचा सह संघटनेचे पदाधिकारी मिलिंद चौधरी, मनिष सोनिग्रा, चैतन्य जगताप ,दीपक जोशी महिला पदाधिकारी बॉबी करणांनी , पल्लवी गाडगीळ , गीता जेसवानी , शालू परिहार , अंजली तुरारे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते . पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त करून ८ आरोपींना अटक केली व ३५०० कोटींचे ड्रग जप्त केले , पोलिसांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी होती या बद्दल हा सन्मान करण्यात आला .  ड्रुग्स जप्त केल्याने ते तरुण पिढी पर्यंत पोचू शकले नाही त्या मुळे अनेक जण व्यसनाधीन होण्या पासून  वाचले हि पोलिसांची मोलाची कामगिरी असल्याचे कपोते म्हणाले.

See also  सर्व समाजघटकांना न्याय देऊन राज्यातील विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देणारा अर्थसंकल्प - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील