पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गाची कामे आणि चांदणी चौकातील दुरुस्त्यांच्या कामाचा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून आढावा

कोथरूड : पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गाची कामे आणि चांदणी चौकातील दुरुस्त्यांच्या कामाचा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून आढावा घेतला.
पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गातील काही महत्त्वाचे टप्पे पुणे जिल्ह्यातून जातात. तेथे अंतिम टप्प्यात असलेली कामे ३० मे पूर्वी पूर्ण व्हावीत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

यावेळी NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम, वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ह.भ. प. मारुती महाराज कोकाटे, अभियंता सौरभ गांधी, व्यवस्थापक अभिजीत औटे, डी.श्रीनिवास राव, किशोर भावेकर आदी उपस्थित होते. आढावा घेतेवेळी असे लक्षात आले की अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहणाचे प्रश्न, जागा मालकांचे प्रश्न बाकी असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हे प्रश्न मांडणे गरजेचे आहे. यासाठी खासदार मेधा कुलकर्णी उद्या दिनांक ५ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहेत.


महामार्गावरील अनेक कामे पूर्ण होत आली असून ती लवकर पूर्ण व्हावी जेणेकरून वारकरी संप्रदायाला कोणताही अडथळा होणार नाही. तसेच चांदणी चौकातील पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल आवश्यक असून काही दिशादर्शक फलक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहेत. तेही त्वरित दुरुस्त करण्यात यावेत यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी सूचना दिल्या.

See also  महापुरुषांच्या नावाने गरळ ओकणाऱ्या संभाजी भिडेवर कारवाई करा ,संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करून अटक करा अशी मागणी हडपसर मधील संघटनांनी केली.